अंक: ललित दिवाळी १९८६ असत्याचे बेदिक्कत वाभाडे काढणारा सत्यव्रत योद्धा कादंबरीकार म्हणून जॉर्ज ऑरवेलची कीर्ती जाणत्यांच्या जगात मंजूर आहे. कितीही मिट्ट काळोख असो, वा भुलभुलैय्या, ऑरवेलला सत्याचा किरण नेमका दिसे. मात्र, ही अलौकिक सिद्धी ह्या ब्रिटिश लेखकाच्या पदरात अवचित पावसासारखी काही अचानक पडली नाही. अवघं शेहेचाळीस वर्षांचं औटकं आयुष्य लाभलं. त्यातली त्याची पहिली चाळीस वर्षं प्रत्यक्ष अनुभव वेचण्याच्या भरात खणाखणी करण्यात गेली. पैसे जेमतेम सुटले. अगदी कमीत कमी मानधन देऊ शकणाऱ्या ‘ट्रीब्यून’चा तो लेखक होता. धारदार स्तंभलेखक, वैचारिक निबंधकार, निपुण कादंबरीकार आणि कपटी राजकारणाच्या यंत्राची रचना स्पष्टपणे पाहू शकणारा हिकमती, म्हणून त्याने बहुत काळ उमेदवारी केली. तडजोडीचं नाव न काढता लेखणी कायम परजली. युद्धखात्यात नोकरी केली. काही काळ लंडनच्या बी.बी.सी.वर तो भाषण विभागाच्या प्रोड्यूसर होता. प्रसंगी त्याने कॅन्टीनही चालवलं. पण चळचळीत संपत्ती अशी त्याला कधीच दिसली नाही. त्याची आवक यथायथाच होती. ह्या धावपळीत इतर संसारिक सुखाची किरणंही ऑरवेलच्या अंगावर पडली नाहीत. त्याने समानशील कार्यकर्त्या तरुणीबरोबर लग्न केलं. तथापि, जोडपं निपुत्रिक ठरलं. भरीस डांग्या खोकल्याने त्याला ग्रासलं. पत्नीच्या ओटीपोटात व्रण निर्माण झाला. शस्त्रक्रियेचा खर्च झेपणार नाही म्हणून तिनं दुखणं अंगावर काढायला सुरुवात केली. व्रणाचं रूपांतर छुप्या गाठीत झालं, तरी एका शब्दानेही त्याची स्पष्ट वाच्यता तिने ऑरवेलपाशी केली नाही. ऑरवेललाही पत्नीच्या दुखण्याची उग्रता कळली नाही. दिवस उगवत होते. दिवस मावळत होते. करता करता ऑरवेल बेचाळीस वर्षांचा झाला.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Subhash Suryavanshi
4 वर्षांपूर्वीलेख छानच! आवडला.
Chandrakant Chandratre
4 वर्षांपूर्वीलेख आवडला.
Suresh Kulkarni
4 वर्षांपूर्वीलैंगिक स्वातंत्र्य देणारे पुरुष खरंच महान असतात.लेखक असण्यापेक्षाही ?
Hemant Marathe
4 वर्षांपूर्वीखूपच ह्रुदयद्रावक कहाणी आहे ऑरवेलची
Abhinav Benodekar
4 वर्षांपूर्वीपिंगे अलिप्तपणाने, कमी शब्दात पण पक्क्या विचारांनी आकर्षक लिहितात. ओर्वेल गाजलेला पण त्याच्या लिखाणाचा अनावश्यक तपशील न देता त्याच्या वधूसंशोधनाच्या मोहिमेचा तपशील पिंग्यांनी दिला आहे.. इंगज -कोकणी आर्थिक दृष्टिकोन साम्यामुळे ओर्वेलचे म्हणणे पिंगे अचूक लिहितात.
Mukund Deshpande
4 वर्षांपूर्वीवाह, किती संवेदनशील लेखन,
atmaram jagdale
5 वर्षांपूर्वीमनाला चटका लावणारा लेख
rakshedevendra
6 वर्षांपूर्वीऑरवेलचा जन्म भारतातला (बिहार मधील मोतीहारी या गावातला). त्याचे वडील ब्रिटीश सरकारचे नोकर होते. बालपणातील उणीपुरी १० वर्षे त्याने भारतात काढली नि तो शिक्षणासाठी ब्रिटन मध्ये गेला. बी.बी.सी. मध्ये नोकरी करण्यापूर्वी तो स्वतः ब्रह्मदेशात ब्रिटीश सैन्यात नोकरी करीत होता. बर्मीज डेज ही त्याची ब्रह्मदेशातल्या अनुभवांवर आधारित. मोतीहारीमध्ये त्याचे स्मारक भारतीय सरकारने बांधले आहे. भारताविषयी आपुलकी, मात्र भारतीय स्वातंत्र्यलढयाबद्दल त्याला फारसे औत्स्युक्य नव्हते, भारतीय नेत्यांच्या क्षमतेविषयी तो संशयी राहिला. नेहरू मंत्रीमंडळातील एक कृष्ण मेनन हे जॉर्ज ऑरवेलच्या मित्रांपैकी एक. नेहरूं एकंदर इंग्रजी प्रभावाखाली कायम असत. अटलबिहारी एक इंग्रजी नियतकालिकाचे संपादक म्हणून त्यांच्या बद्दल आदर. त्याच नियमाने कृष्ण मेनन यांची इंग्रजी साहित्यिकांशी असलेल्या जवळिकीचा असाही फायदा कृष्ण मेनन यांना नेहरूंच्या जवळ जाण्यासाठी झाला असे म्हणता येईल. ऑरवेल तंत्रज्ञानाच्या विरुध्द नव्हता, पण तंत्रज्ञानाच्या वापराने मनुष्यप्राण्यांवर पाळत ठेवण्याची सोय तर सरकारी यंत्रणेकडे जाणार नाही ना याबाबत तो कमालीचा साशंक होता. 'बिग ब्रदर इस वोचींग' हेही त्याच्या अशाच धारणेतून व्यक्त झाले होते. भारतीय नेत्यांची क्षमता आणि तंत्रज्ञाविषयी (असे दोन्ही) साशंकता यामुळेदेखील त्याच्या दृष्ट्यावृत्तीची ओळख होते.
abcd
6 वर्षांपूर्वीorwel and pinge, solid combination
Jayantgune
7 वर्षांपूर्वीया क्षणी मी सॅन डीएगो येथील एका इप्सितळात आहे। तेथील एक डॉक्टरला बघितल्यावर मला त्याचा चेहेरा ओळखीचा असावा असं नवाटायला लागलं। तेथेच वाट बघत असताना हा लेख वाचला, आणि लक्षात आलं की तो अगदी ऑरवेल सारखाच दिसतोय। लेख अप्रतिम, पिंग्याच्या शैलीत
मोहिनी पिटके
7 वर्षांपूर्वीसर्जनशील कलावंताचे प्राक्तन ऑर्वेलच्या वाट्यालाही आले होते . हे वेदनामय एकटेपण कदाचित त्यांच्या निर्मितीची प्रेरणा ठरत असेल . कारण श्रेष्ठ साहित्य अशा वेदनेतूनच जन्म घेते अस्वस्थ करणारा लेख
natujaya
7 वर्षांपूर्वीआभार .
अमोगसिद्ध
7 वर्षांपूर्वीआॅरवेलची जीवनकहाणी भन्नाट. .. धन्यवाद!
Kiran Joshi
7 वर्षांपूर्वीApratim!
aniruddhak72
7 वर्षांपूर्वीसुंदर लेख, केवळ पुनश्च मुळे हे लेख वाचायला मिळतात.
मुग्धा भिडे
7 वर्षांपूर्वीइतक्या चांगल्या व्यक्तिमत्वाचा नियतिने केलेला हा दारुण पराभवच