आला क्षण गेला क्षण

पुनश्च    विघ्नहरी देव    2020-09-05 06:00:56   

अंक : एकता, मे १९६५ लेखाबद्दल थोडेसे : काळ आणि वेळ बांधून ठेवणे, काळाची चक्रे उलटी फिरवणे, काळाची गती कमी -जास्त करणे हे केवळ मानवी क्षमतेच्याच पलिकडले नाही तर ते खुद्द काळालाही शक्य नाही, हे आपल्याला माहिती असते. परंतु म्हणूनच 'काळ' माणसाच्या आदिम आकर्षणांपैकी एक आहे. महाभारत या मालिकेची कथा प्रेक्षकांना खुद्द काळ सांगतो ही कल्पना काळाच्या आरपार पाहण्याची क्षमता असलेल्या 'काळ'पुरुषाच्या संकल्पनेतूच आली होती.  काळ चालला पुढे, वक्त का हर शै पे राज, आनेवाला पल जानेवाला है, आगे भी जाने तू....अशा अनेक गाण्यांपासून तर 'आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक' सारख्या कविंतांपर्यंत सगळीकडे काळाबद्दलचं हे गूढ आपला ताबा घेताना दिसतं.  हा काळ किती मौल्यवान आहे याबद्दलचा हा ललितनिबंध आपल्या रोजच्या जगण्यातून, आशा-आकांक्षातून काळाचं माहात्म्य सांगतो..अतिशय सोप्या-सुलभ भाषेत....हा लेख तब्बल पंचावन्न वर्षांपूर्वीचा आहे, म्हणजे बघा किती 'काळ' गेला...! काळ ही संपत्ती आपल्या सगळ्यांचा प्रत्येक क्षण म्हणजे दुर्लभ आणि मोलाची संपत्ती आहे. रोजच्या जीवनात आपल्याला पुष्कळच जिनसांची गरज लागते. पैसा टाकून आपण त्या विकत घेतो. संपत्तीचे मोल देऊन आपण त्या जिनसा हस्तगत करतो! म्हणजे, जीवनांत त्या आवश्यक जिनसा मिळवायला उपयुक्त ठरणं, हा संपत्तीचा उपयोग. समय ही जी जिन्नस आहे, तिचा असा उपयोग होतो कां पाहूं. उपयोग होत असला, तर तिची पैशाशी तुलना करू, प्रत्येक क्षण म्हणजे पर्यायाने समय ही महत्त्वाची, अमोल, दुर्लभ इत्यादी गुणविशिष्ट संपत्ती आहे, हे ध्यानांत येऊ शकते. खरोखरच समय ही उपयुक्त वस्तूंच्या—सद्गुणांच्या म्हण ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चिंतन , ललित , एकता

प्रतिक्रिया

  1. chandratre_adv@yahoo.co.in

      5 वर्षांपूर्वी

    वेळेच महत्व सांगणारा छान लेख

  2. chandratre_adv@yahoo.co.in

      5 वर्षांपूर्वी

    छान लेख

  3. sandeepgtodkar@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    प्रत्येक क्षण जगणे एवढेच आपल्या हाती आहे. म्हणून चला जगून तरी बघू या. 🙏

  4. daherenkoji@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    सुंदर, समर्पक शब्दांत वेळ...काळ..समयाची मांडणी केली आहे. धनसंपत्तीहून समयसंपत्ती अधिक दुर्लभ आहे. बिंदूतून रेषा, थेंबातून सागर तसा क्षणा क्षणातून उलगडत जाणारा काळ..! अतिशय सहज ओघवत्या भाषेत वेळेचे महत्व अधोरेखित केले आहे.

  5. mukunddeshpande6958@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    लेख फारच छान

  6. rajakulkarni11@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    दुर्मिळ अथवा दुर्लभ वस्तू असून त्या मध्ये उपयोगिता म्हणजे गरज भागवण्याची क्षमता आहे म्हणून संपत्ती दुर्मिळ आहे

  7. dhananjay

      5 वर्षांपूर्वी

    छान लेख आहे, काळाचा महिमा अगाध आहे.प्रत्येक क्षण सत्कारणी लावणे हेच ध्येय असले पाहिजे.



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts