राहून गेलेल्या गोष्टी १- नानासाहेब आणि बाळासाहेब
अंक :किस्त्रीम दिवाळी अंक, १९८५
लेखाबद्दल थोडेसे : रोजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जगण्यात असंख्य गोष्टी आपल्याला खुणावत असतात. अनेक गोष्टी करायच्या राहून गेलेल्या असतात. दरवर्षी नव्या उत्साहानं काही नवे संकल्प आपण करतो आणि ते राहून गेले म्हणून वर्षाच्या शेवटी हळहळतो. अगदी वैयक्तिक, कौटुंबिक गोष्टीपासून ते थेट सामाजिक—राजकीय गोष्टींपर्यंत अशा राहून गेलेल्या गोष्टींची यादी वाढत राहाते. यातल्या काहीची चुटपूट लागते काही राहिल्या म्हणून सरळ खंतच वाटते. आयुष्य पुढे जाईल तसतशा त्या गोष्टी घडण्याची शक्यताही कमी होत जाते.तुमच्या आमच्यापेक्षा नामवंतांच्या आयुष्यात अशा राहून गेलेल्या गोष्टींची यादी मोठी असणं स्वाभाविक आहे. नानासाहेब गोरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या अशा या ‘राहून गेलेल्या गोष्टी’. आणखीही काही प्रमुख लोकांच्या ‘या राहून गेलेल्या गोष्टी’ पुनश्चमधून पुढे देणार आहोत.
पत्रकार आणि लेखिका संध्या टाकसाळे यांनी विविध व्यक्तींच्या मुलाखती घेऊन हा शोध घेतला आहे. त्यातीलच या दोन मुलाखती आहेत. नानासाहेब गोरे आणि बाळासाहेब ठाकरे. एकमेकांचे राजकीय विरोधक परंतु दोघेही दिलखुलास. बाळासाहेबांनी राहून गेलेल म्हणून जे सांगितलं, त्यातील किमान एक गोष्ट पुढे प्रत्यक्षात आली.
********
नानासाहेब गोरे – सबळ विरोधी पक्ष आजही निर्माण झालेला नाही!
राजकारणात पडायचचं ठरवलं त्यावेळी ते संघर्षमय आहे याची खात्री होतीच. त्यामुळे जे करायचं ते झालं नाही अशी खंत वाटत नाही. कारण या संघर्षमय जीवनात काही गोष्टी राहून जाणार हे गृहितच होतं. तरी काही गोष्टींची चुटपूट आहे.
१९३० साली तुरुंगात गेलो आणि माझं ‘व्हायोलिन’ सुटलं. व्हायोलिन हे माझं अत्यंत आवडतं वाद्य. त्याचे धडे मी घेत होतो. बाहेर आल्यानंतर मी कार्यकर्ताच झालो. व्हायोलिन ही अशी चीज आहे की नियमित रियाझ केल्याशिवाय जमणं शक्य नाही. त्यामुळे तेव्हापासून व्हायोलिन मागे पडलं ते पडलंच.
बाळासाहेब ठाकरे – महाराष्ट्रामध्ये ‘डिस्नेलँड’ धर्तीवर काहीतरी व्हायला पाहिजे होतं.
लहानपणी मला चित्रकलेची जेवढी आवड होती आणि गोडी होती तेवढी शिक्षणाची कधीच लागली नाही. गरीबीमुळे शिक्षणही पूर्ण करता आलं नाही. परंतु चित्रकला हा खरा रक्तातून आलेला वारसा! मी संगीतकार व्हावं असं वडिलांना वाटत होतं. पण ते मला कधीच जमलं नाही. तो माझा पिंड नव्हता. हे कळल्यावर वडिलांनी माझ्या चित्रकलेलाच प्रोत्साहन दिलं. चित्रकार म्हणून मी फार समाधानी आहे. ओळींमधलं दिसणं हा माझ्यातल्या व्यंगचित्रकाराचा जो गुण आहे तो शिवसेनाप्रमुख म्हणूनही मला फार उपयोगी पडला. पण अलीकडे व्यंगचित्रांना पाहिजे तेवढा वेळ देता येत नाही. त्यामुळे व्यंगचित्र काढणं थांबवलं आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .