...अंक :रोहिणी, फेब्रुवारी १९५९
लेखाबद्दल थोडेसे : 'होत्याचे नव्हते' किंवा 'नव्हत्याचे होते' झाल्याची अनेक उदाहरणे हिंदी चित्रपटसृष्टीत आहेत. परंतु या दोन्ही गोष्टी लागू पडतील अशा टुनटुन या गायिका अभिनेत्रीची ही कथा आहे. 'अफसाना लिख रही हू' हे गाणे ज्या काळात लोकप्रिय झाले तो काळ शमशाद बेगम, नूरजहां, सुरैया यांचा होता. लता मंगेशकरांचा उदय थोडा दूर होता.त्या काळात उमादेवी आणि पुढे टुनटुन म्हणून अपार लोकप्रियता मिळवलेल्या या कलावतीचा हा जीवनप्रवास. हा लेख जवळपास साठ वर्षांपूर्वीचा आहे. म्हणजे लेख प्रसिद्ध झाल्यानंतर पुढली जवळपास दोन अडीच दशके टुनटुन पडद्यावर हसवत होती. २४ नोव्हेंबर २००३ रोजी तिचे देहावसान झाले.
********
“अफसाना लिख रही हूं दिले बेकरार का। आंखो में रंग भर के तेरे इंतजार का।” हे गीत आपण विसरला नसाल असं वाटतं. विसरलाच असाल तर “काहे जिया डोले हो कहा नहीं जाए।” हे गीत तर आपणांस नक्कीच आठवत असेल. पहिले गीत आहे, ‘दर्द’ या बोलपटांतील. हे उमा हिने गायिले होते; आणि दुसरेही तिनेच गायले आहे, “अनोखी अदा” या बोलपटांत. या दोनही बोलपटांचे सं. दिग्दर्शक नौशाद होते. त्यांच्या सुमधूर संगीताने सजलेल्या या गाण्यांना उमाच्या मोहक स्वरांची जोड मिळाल्यानं या गीतांनी अशी जादू केली की, ही गीतं कित्येक वर्षे सिनेरसिकांच्या तोंडांतून नकळत बाहेर पडत. ही गीतं गुणगुणणाऱ्यांनी याचा विचार केला आहे कां कीं हे गीत कुणी गायलं आहे? लता मंगेशकरला कोण ओळखत नाही? पण ज्यावेळी वरील गीत गाणारी गायिका पार्श्र्वगायिका म्हणून चित्रपटांत येऊं लागली; त्यावेळी अशा कलाकारांकडे फारच थोड्या लोकांचं लक्ष जात असे. वरील गीतं गाणारी पार्श्र्वगायिका म्हणजे उमा ही होय.
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



















