डॉ. जयंत नारळीकर – बागेत काम करता आलं असतं तर?
माझा केंब्रिजमधील एक मित्र म्हणतो की दिवस छत्तीस तासांचा असता तर बरे झाले असते. त्याला जी जी कामे उपकायची असतात त्यासाठी दिवसाचे चोवीस तास अपुरे पडतात. त्यामुळे अनेक गोष्टी करायच्या राहून जातात.
दिवस छत्तीस तासांचा असो, आठवडा दहा दिवसांचा असो किंवा आयुष्य शंभर वर्षांचे लाभो...राहून गेलेल्या गोष्टींची मालिका संपत नाही. माझ्या राहून गेलेल्या वस्तूंच्या मालिकेतील काही उदाहरणे अशी आहेत.
दत्ता सामंत – माझ्या कामगारांनी मला थोडासा राजकीय पाठिंबा दिला असता तर....
मी डॉक्टर झालो. त्यापूर्वी देशातली आणि जगातली मोठी कामगार चळवळ मी करणार असा कधी विचारही केला नव्हता. या क्षेत्रात पडेन असं वाटलंही नव्हतं. अगदी लहानपणापासून डॉक्टर व्हावं असं मात्र वाटत होतं—त्यासाठी प्रयत्न केले. खरं तर माझं गणित खूप चांगलं होतं. मॅट्रिकला गणितात १०० पैकी १०० मार्क मिळाल्यानं बक्षिसंही पटकावली. पण डॉक्टर व्हायचं म्हणून मग गणित सोडून बायॉलॉजी वगैरे सारख्या विषयाकडे वळावं लागलं. ह्यामुळेच गणितामध्ये दाखवलं तसं प्रावीण्य मला डॉक्टरी अभ्यासक्रमात दाखवता आलं नाही. एम.बी.बी.एस. पूर्ण केलं एवढंच! आता कामगार चळवळीत पडलो आणि डॉक्टरकी सोडावी लागली याची अजिबात खंत वाटत नाही.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .