अंक : अभिरुची, दिपावली १९९४
एक चांगला कथालेखक, एक चांगला कादंबरीकार, एक चांगला नाटककार आणि एक आगळा विनोदकार दळवींच्या निधनामुळे आपल्यातून गेला आहे. त्यांचा ठणठणपाळ आणि त्याला लाभलेली वसंत साखरे यांच्या व्यंगचित्रांची व अर्कचित्रांची साथ हे तर मराठी वाङ्मयात घडलेले एक अद्भूतच आहे. त्या व्यक्तिमत्त्वात एक अवखळ तरीही अलिप्त अशी चपल विनोदबुद्धी होती; आणि त्यातला जिव्हाळा तितकाच परखड होता.
अमुकच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून येणे कठीण आहे असे अनेकदा म्हटले जाते, पण खरोखरच हे म्हणणे ठणठणपाळला लागू पडणारे आहे आणि याचे कारण जयवंत दळवींचा निर्व्याज, व्रात्य तितकाच शहाणा, निर्मळ, उमदा, निगर्वी, निर्मत्सर, अलिप्त स्वभाव आणि माणसाच्या वागण्या बोलण्याचे त्यातल्या बारकाव्यांसकट निरीक्षण करण्याची त्यांची वृत्ती हे एकत्र झालेले रसायन कैक वर्षांनी प्रथमच त्यांच्या रूपाने अवतरले होते. दळवींच्या मृत्यूने आपण गमावलेला माणूस हा त्यांच्यातल्या साहित्यकारापेक्षाही फार फार मोठा आणि विरळा होता.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .