विनोदाबद्दल माझी भूमिका

पुनश्च    भा.रा. भागवत    2021-02-27 06:00:04   

अंकः मराठी साहित्य पत्रिका, ऑक्टोबर-डिसेंबर १९९५

लेखक – भा.रा. भागवत

लेखाबद्दल थोडेसे : भा. रा भागवत यांचे नाव घेता क्षणी आपल्याला फास्टर फेणेच आठवतो, मात्र त्यामुळे भागवतांचे इतर साहित्यित कर्तृत्व लोपले जाते. बालसाहित्याकडे वळण्यापूर्वी त्यांनी बरेच विनोदी लेखन केले होते. त्यांचा हा काळ ज्यांनी अनुभवला होता, त्यात एक होते समीक्षक शंकर सारडा. बहुधा त्यामुळेच सारडांनी भागवतांना साहित्य पत्रिकेच्या अंकात हा लेख लिहायला सांगितले असावे. भागवतांनी या लेखात त्यांच्या विनोदी लेखनाचा घेतलेला आढावा आपल्याला त्यांचा एक वेगळाच पैलू दाखवून जातो. त्यांच्या बालसाहित्यात विनोदाची जी एक सूक्ष्म पेरणी आहे, तिचा झरा कुठून फुटला असावा ते हा लेख वाचून लक्षात येते. *

*******

अंकः मराठी साहित्य पत्रिका, ऑक्टोबर-डिसेंबर १९९५  

प्रिय शंकर सारडा,   माझ्या विनोदी लेखनाची चिरफाड मीच करावी असा तुमचा डाव दिसतो. ठीक आहे. प्रयत्न करतो.   माझ्यातल्या विनोदाचा उगम नेमका कुठे झाला हे सांगणं कठीण आहे. मनुष्य हा एकमेव हसणारा प्राणी आहे असं म्हणतात. ते खरं असेल तर माणसाचं बाळ जन्मल्याबरोबर ट्यांहा ट्यांहा करतं आणि आपण बाळ रडलं असं म्हणतो. पण त्याचं ते हसणं कशावरून नसेल? कारण हसण्याच्या तऱ्हा अनेक असू शकतात. पुढे काही माणसं गंभीर प्रवृत्तीची आहेत असं लक्षात येतं, तर काही माणसं हलके फुलके विषय हाताळतात अन् त्यामुळे ती काही बोलली तरी तो विनोद ठरतो हे आचार्य अत्र्यांनी सिद्ध केलंच आहे. मी अगदी ‘बाळ’ असताना मला कुणीतरी ‘तुझं नाव काय?’ असा विचारलं आणि त्यावर मला बोलता येत नसल्यामुळे मी काहीतरी ‘त – त - प – प - पी’ असा उच्चार केला. आणि झालं! त्यावरून या निरागस बालकाला लोक ‘पापी’ म्हणू लागले. पुढे त्या ‘पापी’चं कुणी ‘पॉपी’ केलं, तर कुणी ‘पपी’हाच नसेल ना माझ्यातल्या विनोदाचा झरा?   काही असो, पुढे मी जेव्हा संस्कृत शिकू लागलो तेव्हा मला कळलं, की ‘पपी’ म्हणजे सूर्य, आणि मला एक प्रकारे धीर आला.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


विनोद , मराठी साहित्य पत्रिका
विनोद

प्रतिक्रिया

  1. Aparna Ranade

      4 वर्षांपूर्वी

    विनोदाचा मर्म उलगडणारा लेख मस्त

  2. atmaram jagdale

      4 वर्षांपूर्वी

    अगदी निरागस पणे आपली विनोदी जडणघडण भा रा . भागवतांनी मांडली आहे : त्यांचं कोणतही साहित्यिक लिखाण दुदर्यवाने वाचनात आलेले नाही . त्यामुळे अंदाज नाही . लेख मात्र छान वाटला .

  3. Sandhya Limaye

      4 वर्षांपूर्वी

    खूप छान, विनोदाचे मर्म उलगडणारा लेख



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts