कुणा तरी पुढाऱ्याचे पत्र घेऊन पहिल्या प्रथम गांधींना भेटायला गेलो. पुढाऱ्याला पत्राचे उत्तर हवे होते. आणि मला गांधीजी जवळून पाहायचे होते. संध्याकाळची वेळ. गांधीजी फिरायला निघाले होते. एखादा बडा मंत्री शहरातल्या रस्त्याने जात असताना टप्प्याटप्प्यावर पोलीस असलेले आज जसे दिसतात तशी पोलिसाऐवजी काही माणसे उभी असलेली मी पाहिली. एका टप्प्यावर गांधीजी आले की त्यांच्याशी बोलणारा मनुष्य बाजूला होई आणि त्या टप्प्यावर असलेला मनुष्य त्यांच्याबरोबर बोलू लागे. पुन्हा दुसऱ्या टप्प्यावर माणसांची अदलाबदल होई. गांधींच्या सायंकाळच्या चारपाच फर्लागांच्या फिरण्यात दहावीस माणसांच्या तरी मुलाखती महादेवभाई घडवून आणीत. कोणत्या टप्प्यावर उभे राहून त्यांना पत्र द्यावे, द्यावे की न द्यावे, या विचारात मी पडलो.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Ravindra Pinglikar
10 महिन्यांपूर्वीकिती भव्य उंचीची माणसे,बापू दिव्यत्वाची जेथ प्रचीती तेथे कर माझे जुळती.हे टिपणारे, व्यक्त करणारे वामनराव चोरघडे ही किती मोठे.
saurabh photography
11 महिन्यांपूर्वीहृद्य आणि आमच्या पिढीसाठी ठेवा! - एक मिलेनियल.
Hrushikesh Jagannath Mirgal
11 महिन्यांपूर्वी🙏🙏🙏