अंकः माणूस, मे १९६५
लेखाबद्दल थोडेसे : विजय मांजरेकर, चंदू बोर्डे, शिवलकर, सुभाष गुप्ते...अशी क्रिकेटमधील अनेक नावे गेल्या दोन पिढ्यांनी केवळ ऐकलेली आहेत, त्यांचा खेळ पाहिलेला नाही. जुन्या काळाविषयी बोलले जाते तेंव्हा यातील एकेकाच्या नावावर बरेच काही सांगितले जाते. मात्र जरा भूतकाळ उकरुन काढला की लक्षात येते की त्यांच्या चलतीच्या काळात या खेळाडूंच्या गुण-दोषांची सम्यक चर्चा झाली होती. विजय मांजरेकर निवृत्त होऊन आता ५५ वर्ष झाली आहेत आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला त्यालाही सदतीस वर्षे झाली आहेत. मांजरेकर निवृत्त झाले तेंव्हा म्हणजे १९६५ साली प्रसिद्ध झालेला हा लेख नमुनेदार आहे. याला गुणवर्णन म्हणावे की दोषदिग्दर्शन असा प्रश्न पडेल. परंतु यातून त्यांच्या उणे-अधिक दोन्ही बाजू छान सांगितलेल्या आहेत, हे खरेच...
********
“कसोटी सामन्यांतून ह्यापुढे विजय मांजरेकर दिसणार नाही, म्हणून मला स्वतःला फार वाईट वाटत आहे. गेले एक तप तो भारताचा एक यशस्वी खेळाडू होता. त्याचे फलंदाजीचे ‘टेक्निक’ अचूक आहे व तो मारीत असलेले फटके नेत्रदीपक असतात. सांप्रत मांजरेकरशिवाय निवड समितीचे चालत असेल, तर त्यांच्यासारखे भाग्यवान कोणी नाही, असंच म्हटलं पाहिजे...” मांजरेकरचा इतका यथार्थ गौरव दुसरा कोणीच करू शकला नसता असंच म्हटलं पाहिजे. मांजरेकरच्या निवृत्तीमुळे एक पर्व संपले. क्रिकेट शौकिनांचा लाडका "जाड्या” आता त्यांना कसोटी सामन्यांत दिसणार नाही!
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .