स्मृती


चाळीस सालच्या सुमारास आम्ही पुण्यात येऊन राहिलो. इथे सावरकरांची व्याख्याने मी प्रथम ऐकली. त्यांनी मी भारावून जाई. त्यांत गांधीजींच्या तत्वज्ञानावर धारदार हल्ले असत. गांधीजींविरुद्ध काही मला आता प्रथमच ऐकण्यासारखे मिळू लागले. मी संघातही जाऊ लागलो. गणवेष करून कवायती करू लागलो. इथे मुलेमुले एकमेकांना गांधी नेहरू, पटेल यांच्याविषयी काल्पनिक गोष्टी अर्धवट श्रद्धेने, अर्धवट गमतीने सांगत. त्या त्यांनी आणखी कुठे ऐकलेल्या असत. मीही त्या सांगू लागलो. शनिवारवाड्यापुढे काँग्रेसचा युद्धविरोधी वैयक्तिक सत्याग्रह मी पाहिला आणि गांधीजींची आणि त्यांच्या सत्याग्रह-उपोषणांची आणखीच टिंगल मी बरोबरीच्या मुलात करू लागलो. त्या काळात मराठी साप्ताहिके देखील अशी टिंगलटवाळी छापीत. ती मी आवडीने वाचत असे. गांधीजींची व्यंग्यचित्रे येत. त्यात चित्रकार दलाल रेखाटीत ते व्यंग्यचित्रातले गांधीजी मला इतके आवडले आणि सोपे वाटले की मी तसे गांधीजी भराभर काढू लागलो. छोटे कपाळ, मोठे नाक, नाकावर ओघळती आरशी, दात नसलेली जिवणी, पसरट मोठे कान, डेरेदार गोट्यावर भुरभुरती शेंडी, हाती काठी आणि कमरेच्या पंचाला अडकवलेले साखळीचे घड्याळ, असे व्यंग्य चित्रातले गांधीजी असत. मोठमोठ्या टांगा टाकीत ते घाईने कुठेतरी निघालेले असत. दलाल जीभ बाहेर काढलेली एक बकरीही दाखवीत. मी काढली म्हणजे ती कुत्र्यासारखी वाटे म्हणून मी फक्त गांधीजी काढी आणि ते मात्र गांधीजीच वाटत. असे गांधीजी काढण्याची त्या काळात मला इतकी सवय झाली की अभ्यासाच्या बहुतेक साऱ्या 'रफ' वह्यांत गांधीजीच गांधीजी झाले. जवळजवळ याच काळात इतके सोपे चित्र झाले होते हिटलरचे. माझ्या यह्यांतून हे दोघेही गोडीगुलाबीने असत.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


युगात्मा
प्रासंगिक

प्रतिक्रिया

 1. Abhinav Benodekar

    2 वर्षांपूर्वी

  त्या काळात गांधीजी विषयी लोकांना आकर्षण होते हे खरे, पण आज त्यांच्या तत्वज्ञान भारतात तरी यशस्वी झालेले दिसत नाही. तरीही शाळेत सूत कताई, वगैरे पुढे कधी कामा न पडणाऱ्या कवायती कराव्या लागल्या. स्वछता सोडल्यास त्यांना इंग्रजानी मोठे केले आणि बनऊन ठेवले असे जाणविते

 2. सुकृता पेठे

    3 वर्षांपूर्वी

  विलक्षण!

 3. Mukund Deshpande

    3 वर्षांपूर्वी

  सुरेखवाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts