अंक – वाङ्मय शोभा, मे १९६०
चाणक्याच्या काळी जी पुनर्विवाहाची मोकळीत होती ती ब्राह्मणादी चारही वर्णांच्या स्त्रियांस होती; इतकेच नाही तर पुनर्विवाह करू इच्छिणाऱ्या स्त्रियांचा पहिला पती मृतच असला पाहिजे असाही निर्बंध नव्हता. पती दिवंगत झाला, शिक्षणाकरीतां कोठे राहिला किंवा परदेशी गेला तर कांही विशिष्ट वर्षे तत्याची मार्गप्रतिक्षा करून, या स्त्रियांनी पुनर्विवाह करण्यास मुभा होती. ऋतुकाळी पत्नीची हेळसांड करणे म्हणजे स्वधर्मपराङमुख होण्यासारखे मानले जात असे. सर्व स्त्रीधन मिळालेल्या तरुण स्त्रीने पतीची खुशाली कळत असेल तर फार तर दहा ऋतुकाळपर्यंत त्याची वाट पहावी आणि मग न्यायाधिकाऱ्यांच्या संमतीने योग्य वाटेल त्या पुरुषाशी पुनर्विवाह करावा. कांही प्रसंगी तिला आपल्या दीराशी लग्न लावण्यासही परवानगी होती.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .