माझे विनोदी लेखनः एक टिपण

पुनश्च    वि.आ. बुवा    2021-05-29 06:00:02   

अंकः मराठी साहित्य पत्रिका, ऑक्टोबर-डिसेंबर १९९५

पंचतंत्र, सिंहासन-बत्तिशी, वेताळ-पंचविशी आदी पुस्तकांतील निवेदनशैलीचा फक्त घाट वापरून मी विनोदी कथा लिहिल्या आहेत. त्यांची ‘आधुनिक पंचतंत्र’ ‘साहेबासन बत्तिशी’ आणि ‘गद्धे पंचविशी’ या शीर्षकाची पुस्तक प्रसिद्ध झाली आहेत. टिपिकल मराठी मध्यमवर्गीय अशा काही व्यक्तिरेखाही लिहिल्या आहेत. काही म्हटल्या तरी त्यांची संख्या पन्नाससाठ होईल.

विनोदाचे विषय मला सतत सुचत असतात. विनोदी लिहिण्यासाठी इतके विषय आजूबाजूला असतात. इतक्या घटना घडत असतात की, माझ्या सारख्याला तेवढ्यावरच आयुष्यभर सुखानं वाङ्मयीन गुजराण करता येईल. राजकारण, समाजकारण, पुढारी, निरनिराळ्या व्यवसायातले लोक सतत विनोदाचा पुरवठा करत असतात. अशा वेळी “देता किती घेशिल दो करांनी” अशी गोड असमर्थता कधी कधी जाणवू लागते. विषयांसाठी मी कधीच अडून बसलो नाही. विषय रांगेनं उभे असतात. म्हणून तर मी भरपूर लिहू शकतो. आतापर्यंत अक्षरशः शेकडो विषयांवर लिहून झालं आहे.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मराठी साहित्य पत्रिका , विनोद
विनोद

प्रतिक्रिया

  1. Shrikant Bacchuwar

      4 वर्षांपूर्वी

    बुवांचा लेख एकदा वाचायला सुरुवात केली की पूर्ण झाल्याशिवाय ठेववत नाही. प्रसन्न लेखन असते.

  2. Suhas Joshi

      4 वर्षांपूर्वी

    1970 च्या दशकात बुवा, हुमणे ,बाळ गाडगीळ असे लेखक आघाडीवर होते

  3. atmaram jagdale

      4 वर्षांपूर्वी

    बुवांचे लेखन मला नेहमीच आवडत आले आहे . चटपटीत ' कुरकुरीत खमंग आणि लज्जतदार असे त्यांचे लेख असतात . शिवाय ज्ञानात भर पडते . बहुश्रृतता येते . काही म्हणा . पण त्यांचं पुस्तक दिसल्यावर ते मी पटकन उचलतो एवढं खरं

  4. Milind Kolatkar

      4 वर्षांपूर्वी

    काहितरी पाचकळ लिहायचे. मला कधीच भावले नाहीत. कदाचित पु.ल. वगैरे वाचल्यानंतर माझ्या अपेक्षा फारच वाढलेल्या असाव्यात! असे दुय्यम लेखक, लेख इथं न आले तरी चालतील! बाकी मजा येतेय. धन्यवाद.



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts