अंक : मौज १९५८
टाटा इन्स्टिट्यूटच्या पाहणी मंडळाला दऱ्याखोऱ्यांत आणि आडवळणीं असलेल्या गावांत पुष्कळदां मैलन् मैल पायी चालत जावे लागले. खेडुत लोकांच्या मुलाखती घेणे हे एक कसबाचे काम असते. तुम्ही एकदा प्रश्र्न विचारला तर त्याचे उत्तर त्यांच्याकडून मिळेलच असे नाही. कधी ही मंडळी बुजतात, तर कधी कावरीबावरी होऊन जातात. इतकेच नव्हे तर कधी अकारण गैरसमजही करून घेतात. गैरसमजाचे असे प्रसंग आले आणि ते पहाणीवाल्यांनी निभावूनही नेले. एकदां अचानक नदीला पूर आला आणि लगेच पलीकडे जाणे तर आवश्यक होते. तेथे जाऊन कार्यक्रम ऐकून लोकांच्या कार्यक्रमाविषयींच्या प्रतिक्रिया काय होतात, चर्चा कशी होते, किती लोक चर्चेत भाग घेतात हे पाहणे हा या मूल्यमापनाचा एक भाग होता. नदीला तर पूर आलेला! पण ही मंडळी मागे न फिरतां त्यांनी स्वतःला नदीत झोंकून दिले आणि पुराचे पाणी कापून ते पलीकडे गेले. सबंध योजनेच्या या कालावधींत अनेकांनी हा उत्साह दाखिवला, अनेक परींनी साहाय्य केले आणि मोठ्या जिद्दीने त्यांनी ही योजना तडीस नेली.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .