तेल साम्राज्याचा इतिहास ( उत्तरार्ध )

पुनश्च    मधु अभ्यंकर    2021-06-30 06:00:02   

अंकः मौज दिवाळी, १९५८

एक विहिर खोदण्यासाठी दोनशे टन वजनाचे लोखंडी दोरखंड, दहा ते बारा हजार फूट खणण्याचा ९० टन वजनाचा पोलादाचा नळ, बारा हजार फुटांचे दीडशे टन वजनाचे पोलादाचे आवरण, सुमारे पांच हजार पोती सिमेंट, ४८,००० पिंपे पाणी, तीन हजार पिंपे जळणाचे तेल आणि १२५ तज्ज्ञ एवढ्यांची आवश्यकता असते. अशा विहिरीला हिंदुस्थानांत सुमारे तीस लक्ष रुपये खर्च येतो! इतकेही करून तेल मिळाले तर ठीक, नाही तर सगळे पैसे अक्षरशः मातीत जातात! आणि वीस विहिरींपैकी निदान एका विहिरींत तरी तेल मिळेल, असे आशावादीपणाने गृहीत धरले तरी परिणामतः त्या एका विहिरीच किंमत सहा कोटी रुपये भरते! म्हणूनच मोठ्या तेल कंपन्यांखेरीज इतरांना हे साहस पेलत नाही. आसामांत नहरकटिया, हुगरीजान आणि मोगन विभागांत सांपडलेल्या नव्या तेलसाठ्यांच्या प्रदेशातील विहिरी खणून त्यांतून काढलेले अशुद्ध पेट्रोलियम बिहारमधील बरौनी या गांवी उभारण्यांत येणाऱ्या संकल्पित रिफायनरीमध्ये नेऊन पोंचविण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी भारत सरकारने १९५८च्या मकर संक्रांतीला (१४ जानेवारी) भारत ‘आसाम ऑईल कंपनी’ व ‘बर्मा ऑइल कंपनी’ यांच्या सहकार्याने ‘ऑइल इंडिया लिमिटेड’ ही नवी कंपनी स्थापन केली आहे. या नव्या कंपनीला—म्हणजे पर्यायाने भारत सरकारला—बर्मा ऑइल कंपनीकडून एक लक्ष पौंड कर्जाऊ मिळणार आहेत!

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मौज , ज्ञानरंजन , इतिहास
ज्ञान रंजन

प्रतिक्रिया

  1. Hemant Marathe

      4 वर्षांपूर्वी

    किती सविस्तर माहिती दिली आहे दोन्ही लेखांमधून. ही माहिती १९५८ मधील, जेव्हा तंत्रज्ञान एवढं सुधारीत नव्हतं असं म्हणतात. पण हे वाचून असं अजिबात वाटत नाही. आता एवढ्या वर्षांत यांमध्ये आणखी खूपच सुधारणा झाली असणार. खूप खूप धन्यवाद 🙏

  2. Ashwini Gore

      4 वर्षांपूर्वी

    दोन्ही भाग वाचनीय



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts