छुपाते छुपाते बयाँ हो गयी है.... भाग २


आमही कँडलॉक मधून उतरुन देवच्या 'हिलमन मध्ये बसलो, तेव्हा देव ओशाळला. कारण कँडलाँक ही अतिशय मोठी व राजेशाही गाडी होती व हिलमन छोटी होती. मात्र माझ्या दृष्टीने त्या दिवशी देवच्या शेजारी गाडीत बसल्याचा आनंद फार मोठा होता. त्या दिवशी 'हिलमन' मला जगातली सर्वात मोठी व चांगली गाडी वाटली. आम्ही दोघांनी एखाद्या पार्टीला एकत्र जाण्याची ती पहिलीच वेळ होती. त्यामुळे आम्ही प्रवेश करताच अनेकांच्या नजरा आणि छायाचित्रकारांचे कॅमेरे आमच्यावर रोखले गेले. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात पहिल्या पानावर माझे व देवचे हातात हात घातलेले छायाचित्र प्रसिद्ध झाले, त्यानंतर माझ्या आजीने जो काही थयथयाट आणि गहजब केला की, ज्याचे नाव ते. कधी कधी मला वाटतं, ‘प्रेस'ने आमच्या प्रकरणाला दिलेल्या अवास्तव प्रसिद्धीमुळेच आमचे मिलन होऊ शकले नाही!

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. Abhinav Benodekar

      4 वर्षांपूर्वी

    सुरैया साठीपार केल्यावर तिला कोठल्याशा फिल्मी /पुरस्कार समारंभाच्या वेळी देवानंदविषयी बोलतांना टीव्ही वर पहिले "आतासुद्धा तो त्याच पूर्वीच्या गिमिक्स (म्हातारपणी )करतोय याबद्दल ती आश्चर्य व्यक्त करत होती!मात्र सर्वांनच तिचे प्रेम शेवटपर्यंत हळवेच राहिले हेच मानणे बरे वाटते!ती स्वतः भडक लिपस्टिक वगैरेनी विचित्र दिसत होती रंगीत टीव्ही वर!

  2. Aparna Ranade

      4 वर्षांपूर्वी

    जुन्या.आठवणींना उजाळा

  3. Jitendra Dorle

      4 वर्षांपूर्वी

    खुप छान आठवणी..

  4. Dr. Anil Sangle

      4 वर्षांपूर्वी

    काय काय सहन केलं असेल त्याकाळी देव व सुरैय्या ह्या सच्च्या प्रेमवीरांनी ह्याची कल्पना येते ह्या लेखमालेमुळे ..आजवर फक्त ऐकून होतो देवसाठी आजन्म अविवाहित राहिलेल्या ह्या सौंदर्यसम्राज्ञी विषयी .. पण ह्या लेखमालेमुळे प्रत्यक्ष तिच्या तोंडूनच ऐकतोय असा भास होतो..

  5. Dr. Anil Sangle

      4 वर्षांपूर्वी

    काय काय सहन केलं असेल त्याकाळी देव व सुरैय्या ह्या सच्च्या प्रेमवीरांनी ह्याची कल्पना येते ह्या लेखमालेमुळे ..आजवर फक्त ऐकून होतो देवसाठी आजन्म अविवाहित राहिलेल्या ह्या सौंदर्यसम्राज्ञी विषयी .. पण ह्या लेखमालेमुळे प्रत्यक्ष तिच्या तोंडूनच ऐकतोय असा भास होतो..

  6. Varsha Sidhaye

      4 वर्षांपूर्वी

    kiti sundar pan adhuri premkahani

  7. Mukund Deshpande

      4 वर्षांपूर्वी

    वाह, फारच छान शब्दांकन.

  8. Manasi Holehonnur

      4 वर्षांपूर्वी

    मस्त चालली आहे ही सिरीज, पुढच्या भागाची उत्सुकता ताणून धरली जात आहे



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts