छुपाते छुपाते बयाँ हो गयी है....भाग ४


मिळवायचं ते आणि मिळायला हवं तेवढं मिळवलंय. शांतारामबापूंनी मी 'नायिका होणे केवळ अशक्य आहे' असे ठासून सांगितले होतं, त्यांनीच 'तुझ्या बाबतीत माझा अंदाज चुकला, माझे शब्द मला आता मागे घेतले पाहिजेत' असं म्हणून कौतुकाची पावती दिली. याहून मोठा सन्मान कोणता ? ‘मिर्झा गालिब’ साठी खुद्द पं. नेहरूंच्या हातून 'गोल्ड मेडल’ मिळालं. १५-२० मिनिटे बसून निघून जाईन, असे म्हणणारे नेहरूजी 'मिर्झा गालिब' संपूर्ण पाहूनच उठले आणि त्यानंतर सोहराब मोदींना म्हणाले, 'खरं तर या चित्रपटाचं नाव 'चौदवी बेगम' असे ठेवायला हवं होतं.( माझं त्या चित्रपटात चौदवी बेगम असं नाव होतं) यापेक्षा मोठा पुरस्कार आणखी कोणता असू शकेल ? नायिका असण्याच्या काळात न मिळालेली भरपूर झोप आणि सडपातळ राहण्याच्या दडपणाखाली न खाल्लेली बिर्याणी,या दोन गोष्टींचा मनमुराद आस्वाद घेत आज मी जगते. कुठेही जात नाही, तरीही खूप नटूनथटून राहते. गेलो तीस वर्ष असं आयुष्य जगूनही मला त्याचा कंटाळा आलेला नाही.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1.   4 वर्षांपूर्वी

    एका मनस्विनीची मुलाखत. खूप छान.

  2. Abhinav Benodekar

      4 वर्षांपूर्वी

    शांतारामबापूंनी हार कबूल केली हे बरे झाले. एकूण त्या काळातील बऱ्याच लोकांसारखी सुरैयापण गुणी, प्रामाणिक आणि निष्ठावान होती हे खरे. फौंजी भाईसाठी तिने प्रस्तुत केलेल्या जयमाला या रेडिओ कार्यक्रमात आणि टीव्हीवर झालेल्या तिच्या एका दर्शनात दुरून हे जाणविले!

  3.   4 वर्षांपूर्वी

    कुठचाही अभिनिवेश नसलेले अतिशय प्रांजळ कथन... शब्दांकन उत्तम केले आहे... 'नको आहे' ते सर्व काही आहे मात्र 'हवे ते' काहीच नाही.. मीनाकुमारी असो वा सुरैया त्यांच्या आयुष्याची हीच शोकांतिका.. नक्की आठवत नाही, पण बहुधा रेखाने एक मुलाखतीत सांगितले होते.. माझ्या आयुष्याची हीच शोकांतिका की मला सर्व काही मिळाले.. पण एकतर वेळेच्या आधी किंवा वेळेच्या नंतर..

  4. Mukund Deshpande

      4 वर्षांपूर्वी

    वाह, सुरेख आहे मनोगत,

  5. Dr. Anil Sangle

      4 वर्षांपूर्वी

    सुरैय्याच्या जीवनावर आधारित एक पुर्ण लांबीचा चरित्रपट कुणीतरी बनवावा असं वाटलं हे चारीही लेख वाचून ..

  6. ras ras

      4 वर्षांपूर्वी

    Who knows- her Grandmother and Mama must be restricting her to visit Dev even there.

  7. Varsha Sidhaye

      4 वर्षांपूर्वी

    pudhil jnmat tari tyanche prem safal vhave

  8. Shubhangi Kadganche

      4 वर्षांपूर्वी

    एक गूढकथा उलगडल्यासारखं वाटलं वाचताना.



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts