अंक : हंस, फेब्रुवारी १९५६
व्यक्तीच्या जीवनाचं सार्थक्य कशांत तर जन्ममरणाच्या फेऱ्यांतून, सुखदुःखाच्या चक्रांतून मुक्त होण्यांत! ब्रह्मपद मिळविण्यांत! निर्वाणांत! राष्ट्राच्या जीवनाचं सार्थक्य मात्र फार वेगळ्या गोष्टींत आहे. या बाबतींत विचारवंतांनी आपल्या मनाच गोंधळ कधी होऊं देतां कामा नये. भगवद्गीतेविषयी माझा एक आवडता विचार आहे, तो हा की, अर्जुनाला जो ‘व्यामोह’ झाला होता तो व्यक्तिजीवनाची मूल्यं आणि राष्ट्रजीवनाची मूल्यं यांच्या बाबतीतलाच होता. त्या दोहोची गल्लत करून तो म्हणत होता, ‘नको हे लढणं!’ आप्तस्वकीयांची हत्या करून राज्य मिळविण्यापेक्षां त्या राज्याचा त्याग केलेला काय वाईट, अशा शंकेनं तो गोंधळला होता. राज्यभोगापेक्षां राज्यत्यागच त्याला अधिक बरा वाटत होता. त्याला कळेनासं झालं होतं की, वैयक्तिक हिताहिताच्या दृष्टीनं माणसाचं जे कर्तव्य असतं, त्याहून समाजाचा किंवा राष्ट्राचा एक घटक या दृष्टीनं त्याचं कर्तव्य सर्वस्वी भिन्न असण्याची शक्यता आहे. म्हणून पराक्रम, हिंसा आणि राज्यभोग यांची त्याला भिती वाटू लागली होती! गीता सांगितली गेली ती अर्जुनाच्या मनाचा हा गोंधळ नाहीसा करण्यासाठीच! व्यक्तिजीवन व राष्ट्रजीवन यांची मूल्यं भिन्न भिन्न आहेत हे त्याच्या मनावर ठसविण्यासाठीच!
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीछान लेख . बरेचसे समज - गैरसमज दूर झाले