वरील गोष्टीला बरेच दिवस झाले. माझी बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण होऊन मी एल.एल.बी.च्या टर्मस भरूं लागलो. मी बी.ए. होईपर्यंत सर्व कांही ठीक होते. बंडू (माझा सावत्र भाऊ) मला नियमितपणे पैसे पाठवीत असे. पण पुढे परिस्थिती बदलली. पैसे वेळेवर येईनात. वास्तविक आमचे घरचे उत्पन्न फार मोठे होते. बाबांच्या मागे बंडूच सर्व व्यवहार पहात असे. अजून वाटण्या वगैरे झाल्या नव्हत्या. माझ्या शिक्षणाला पैसे पुरवणे त्याचे काम होते. एक सुटीत मी घरी गेलो असतां माझ्या आईचे व वहिनीचे बरेंच बिनसलेले मी पाहिले. शिवाय बंडूही तिला टाकून बोलत असे. या सर्व प्रकारावरून आमचा एकत्र निभाव लागणे कठीण आहे हे मी ओळखले. पण शिक्षण पुरे होईपर्यंत या भानगडीत लक्ष घालावयाचे नाही असे मी आईच्या सल्ल्यावरून ठरविले होते व म्हणूनच मुद्दाम सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले. शेवटच्या सहामहींत तर पैसे येण्याचे बंदच झाले. थोडीफार हंगामी नोकरी, शिकवणी, कांही उसनवार असे करून मी सेकंड एल.एल.बी. पास झालो.
त्यानंतर मी घरी गेलो व माझ्या सावत्र भावापाशी मुद्दामच बोलणे काढून त्याच्या आतांपर्यंतच्या वर्तनाचा सरळ जबाब विचारला.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Kiran Joshi
4 वर्षांपूर्वीग्रेट!
Swatita Paranjape
4 वर्षांपूर्वीधन्य ती मैत्री, ते देशप्रेम आणि त्यागाची, परमार्थाची कळकळ. या अशा आठवणी पुनः आमच्या पर्यंत पोचवून एक सतकार्य आपण करत आहात. धन्यवाद.