काळोखात घट्ट मिटून, अंगाला दुमडून बसलेली डिसेंबरची रात्र. खरंतर डिसेंबर संपायला आला तसं त्रिशालाचं मन नेहमीसारखं द्विधा मनःस्थितीत अडकलंहोतं. तिच्या मनात अचानकच योगीच्या आठवणीचे कढ दाटून येत होते. पण तेही म्हणावे इतके उत्कट नाहीत याचीही तिला पक्की खात्री होती. मनाला नेमका कशाचा क्लेश होतोय, होतोय की नाही हे जवळून बघण्याचा अर्थहीन प्रयत्न त्रिशालाकडून घडत होता. या गोठलेल्या रात्रीचा आठवणीशी असणारा संबंध, योगी आणि तिच्यातल्या धाग्याचे उमटणारे उर्वरित तरंग, त्याची रोज होणारी जाणीव आणि इथेच येऊन तिच्या मस्तकाशी भिडणारी द्विधा मनःस्थिती! उत्तरं शोधण्याची धडपड आहे की नाही?
बाहेर अचानक कधीही पडणाऱ्या पावसाची तिला नुसतीच सवय नाही तर चांगली सोबतच असायची. या भुरुभुरू पडणाऱ्या पावसात अखंड चालत राहावं असं त्रिशालाला कायम वाटे. असे कितीतरी एकेकटे रस्ते, वाटा तिने इथे आल्यापासून तुडवून काढल्या होत्या. ओलेत्या, दमट विचारांसारख्याच कुठेही फुटणाऱ्या वाटा.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .