मी तुम्हाला एक अतिशय हृद्य असा किस्सा सांगतो. एका जुन्या पुस्तकांच्या दुकानात मी गेलो असताना, दोन खंडात्मक अशी मोठी dictionary होती. आर्ट पेपरवर छापलेली. रंगीत. Oxford Illustrated Dictionary. नवीन कोरी होती. ज्याच्याकडे मी जुनी पुस्तकं विकत घेतो, त्यानं मला सांगितले की, “साहेब तुम्ही हे पुस्तक आज घेऊन जा. हा घरातला दागिना आहे.” मी म्हटलं की, “किंमत अठराशे रुपये आहे.” तो म्हणाला की, “मी हे आत्ताच एका पारशाकडून चारशे रुपयाला घेतलं. तुम्हाला मी साडेचारशे रुपयाला द्यायला तयार आहे.” मी म्हटलं, “मी ज्युनियर लेक्चरर तुला साडेचारशे रुपये कुठून देणार?” तो म्हणाला की, “तुम्ही हे घेऊन जा, ह्या नंतर हे पुस्तक मिळणार नाही.” तर ते दोन मोठे खंड असल्यामुळे त्यानं टॅक्सीचे पैसे दिले. त्याचं कारण एकच की ह्यांच्या घरी हे पुस्तक गेलं पाहिजे. जुन्या पुस्तकांचे विक्रेते हे त्या पुस्तकाकडे कुठल्या नजरेनं पाहतात हे या उदाहरणावरून कळून येतं.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
atmaram jagdale
3 वर्षांपूर्वीछान लेख आहे . लेखकाचे अक्षरनिष्ठाची मांदियाळी हे पुस्तक वाचले आहे .