मागील वर्षी (१९६४) मे-जूनमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेत “एक वधू-वर परिचय मंडळ असावे,” अशासाठी पालकांची सभा झाली. विवाह जास्तीत जास्त सुखी व्हावे हा ह्या मंडळाचा हेतू होता. कारण अनोळखी मंडळींच्या गाठीभेटी पडल्याने फसवणूक होते आणि शेवटी निराशा पदरी पडते, असे अनेक पालकांच्या अनुभवास आले आहे. पोळलेल्या वधू-वरांच्या पालकांना परिचय मंडळाची कल्पनासुद्धा पसंत नाही. कारण परिचयाचे नावाखाली काही होतकरू मंडळी मजा मारावयाची असा त्यांचा दावा आहे.
नुकतेच परदेशगमन करून आलेल्या एका युवतीस वाटते की, प्रेमविवाहाला उत्तेजन दिल्याने विवाह सुखी होतो. अगदी पुराणकाळात जावयाचे म्हटले तर राम-सती; कृष्ण-रुक्मिणी; नल-दमयंती; अज-इंदुमती या जोड्या जरी घेतल्या, तरी कृष्ण—रुक्मिणीशिवाय इतरांना वनवासासारख्या अनेक संकटांतून जावे लागले. या मंडळींच्या पत्रिका न पाहाताच लग्ने झाली होती ना?
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .