प्राचीन मराठी वाङ्मयांत आत्मचरित्र असे नांव ज्याला देतां येईल असा एकही स्वतंत्र ग्रंथ नाही. परंतु ज्याला आत्मचरित्रपर भाग म्हणतां येईल असे कांही भाग सांपडतील. नामदेव आणि तुकाराम यांनी आपल्या आयुष्यांतील कांही प्रसंगावर अभंग लिहिलेले सांपडतात आणि हे अभंग एकत्र केले तर तें त्यांचे त्रटित असें एक आत्मचरित्र होईल यांत शंका नाही. ज्ञानेश्र्वरीमधूनही असे कांही उतारे एकत्र करातां येतील. जनाबाईचे आत्मचरित्रपर अभंग तर पुष्कळच आहेत आणि रे. अबेट यांनी ते प्रसिद्ध केले आहेत. अभंगात्मक रचना त्यांतल्या त्यांत आत्मनिष्ठ (Subjective) असते आणि त्यामुळे साहजिकच आत्मचरित्रपर भाग अभंगात्मक रचना करणाऱ्या कवींच्या वाङ्मयांत थोड्याबहुत प्रमाणांत आढळून येतात. आख्यानपर रचना करणाऱ्या कवीच्या काव्यामध्ये आत्मचरित्रपर उल्लेख येतात परंतु हे उल्लेख इतके थोडे आणि मामुली आहेत की त्यांना आत्मचरित्रांतील भाग म्हणणे मुष्कीलीचे होईल.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .