समाजाची विधवांकडे पाहण्याची दृष्टी ही खरोखरच अत्यंत लाजिरवाणी, अनुदार व निंद्य आहे यांत शंकाच नाही. जणू काय विधवा म्हणजे माळावरची माती किंवा बेवारशी मालच होय! पण यांतही हल्ली बराचसा इष्ट असा पालट झाला आहे व ज्या मानाने शिक्षणाचा फैलाव समाजांत होईल त्या मानाने त्यांत पुष्कळच सुधारणा होईल. पण त्यावर तोड म्हणून कुंकू लावणे हा उपाय खास नव्हे. त्याला समाजाच्या अनुदार दृष्टीकोनांतच पालट झाला पाहिजे. ज्याप्रमाणे एकाद्या गरिबाने उंची पोषाख करून मानसन्मान मिळविला किंवा एखाद्या “हरिजनाने” तो स्पृश्य हिंदुसारखा दिसतो म्हणून मानमरातब मिळविला तर त्यांत ज्याप्रमाणे आपण श्रीमंतांचा गरिबांकडे किंवा स्पृष्टांचा अस्पृष्टांकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला असे त्यास म्हणणार नाही त्याचप्रमाणे कुंकू लावल्यामुळेच झालेला विधवांचा मानसन्मानही समाजाच्या अनुदार दृष्टीकोणांत पालट झाल्याचा पुरावा नव्हे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .