साहब मिले सबूरी में...


ब्रिटनमधील प्रमुख राजकीय पक्षांना कार्यकर्ते मिळत नसल्याबद्दलची एक बातमी मध्यंतरी वाचनात आली. अर्थात, कार्यकर्त्यांची ही टंचाई केवळ ब्रिटनपुरती मर्यादित नाही. जगभरातल्या सर्वच लोकशाही देशांमधील राजकीय पक्षांपुढे स्वयंस्फूर्तीने काम करणा-या निष्ठावान आणि निरपेक्ष वृत्तीच्या कार्यकर्त्यांचा अभाव हे अलीकडच्या काळातले एक मोठे संकट आहे. भारतातले राजकीय पक्ष हेही याला अपवाद नाहीत. निवडणुका जिंकून येनकेनप्रकारेण सत्तेवर येणे, एवढा एकच कार्यक्रम झाल्यापासून ‘राजकीय कार्यकर्ता’ नावाच्या संस्थेला कसर लागणे सुरू झाले. राजकारणात अगदी ठरवून, टप्प्या-टप्प्याने ‘करियर’च्या पाय-या चढण्याच्या इराद्याने येणारी मंडळी वगळता, निखळपणे विचारांशी बांधिलकी मानून काम करणारा समूह गेल्या काही वर्षांत आक्रसत गेला आहे. सांप्रतच्या पक्षीय राजकारणात आजमितीस ‘परिवर्तन’ वगैरेची भाषा फारशा गांभीर्याने कोणी वापरतानाही दिसत नाही. भारतातल्या आणि जगातील अन्य देशांमधल्याही राजकीय पक्षांच्या बाबतीत विचारसरणीचा लोप हे स्वयंस्फूर्त आणि कार्यकर्ताधिष्ठित सक्रियता कमी होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणता येईल. पूर्वी सरधोपटपणे ‘डावे’ आणि ‘उजवे’ अशी राजकीय विचारधारांची व पक्षांचीही विभागणी होई. त्यामुळे पक्षांना आपली अशी ओळखही नसे. ‘पोलिटिकली करेक्ट’ राहण्याच्या दडपणाखाली गेल्या वीस-पंचवीस वर्षांत जगभरातली राजकीय मंडळी सुरुवातीला आपणही प्रस्थापित-विरोधी म्हणजेच डावे असल्याचा आणि आता जागतिकीकरणाच्या रेट्यानंतर डावे वगैरे नसून मध्यमार्गी असल्याचा प्रत्यक्ष-अप्र

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अंतर्नाद , चिंतन , समाजकारण , राजकारण

प्रतिक्रिया

  1. ganeshmaali

      6 वर्षांपूर्वी

    खूप छान.. लिहिलं आहे. कोणीतरी यावर लिहिता आहे हेच खूप महत्वाचं आहे. विनयजी खरोखर चे कार्यकर्ते आहेत. मला तर दिसत आहे कि आता कार्यकर्ताच बनायचं नाही आहे कुणाला .. आणि पालकांना तर अजिबातच वाटत नाही कि आपल्या पाल्याने असा काही करावे.. बहुतांश पालकांचा भर आपला पाळ्या कसा चांगली नोकरी मिळवून settle होईल याकडेच आहे. मग कार्यकर्ता समाजासाठी काही करणारे लोक येणार कुठून. !

  2. rakshedevendra

      6 वर्षांपूर्वी

    हा लेख पूर्ण एकांगी वाटतो, कारण एका नेत्याच्या अंगाने कार्यकर्ता या भूमिकेकडे पहिले आहे. ज्याचा राजकीय, सामाजिक अशा कोणत्याही चळवळीशी संबंध नाही पण जो सुजाण नागरिक आहे त्याला कार्यकर्ते या जमातीबद्दल काय वाटते हे पण पहिले पाहिजे. तिसरा वर्ग आहे तो खुद्द कार्यकर्ता, त्यातही दोन प्रकार - एक निरपेक्ष आणि दुसरा सहेतुक. या चार अंगाने यावर विचार झाला असता तर हा लेख परिपूर्ण ठरावा. कोणी वाचक यातली एक एक भूमिका घेऊन यावर लिहू पाहत असेल तरी देखील ते स्वागतार्हच ठरावे. चारही बाजूंचे चार आणि एक सामालोचक असे एकंदर लिखाण वाचायला मिळाल्यास ते उत्तम.

  3. Govind Godbole

      7 वर्षांपूर्वी

    Good experiment

  4. Shaileshnipunge

      7 वर्षांपूर्वी

    अत्यंत महत्वाचे विचार माननीय विनय सहस्त्रबुद्धे सरांनी मांडलेले आहेत, संस्था , संघटन यामध्ये काम करणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्याने मन लावून हे वाचले पाहिजेत आणि त्यावर मनन केले पाहिजे. सुदैवाने मागील वर्षभरात माननीय विजयजी यांच्या बरोबर काही काम कण्याची संधी मिळाली, त्यांना जवळून पाहता आले. त्यांची काम करायची शैली, विचारातील स्पष्टपणा, आणि या सगळ्याला असलेले साधेपणाचे कोंदण. यामुळे आज देखील माननीय विनयजी इतक्या मोठ्या जबाबदारीच्या पदांवर काम करत असताना देखील अत्यंत जवळचे वाटतात. ह्या नम्रपणा मध्येच एक मोठा कार्यकर्ता दडलेला आहे. हा लेख प्रसिद्ध केल्या पद्दल पुनश्च चे देखील मनापासून आभार. शैलेश निपुणगे



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts