बडोद्याच्या ब्राह्मणसभेचा कार्याध्यक्ष आणि कार्यवाह या नात्याने मी वीस वर्षें काम केले. सभेला देणग्या मिळविण्याकरीता मी माझे सहकारी श्री. रेटरेकर यांच्यासह पुष्कळ हिंडलो. देणग्या मिळविणे म्हणजे भिकाऱ्याचेच काम म्हणा ना! पुष्कळ ठिकाणी देणग्या मिळत, पण अधिक वेळां शिव्याच खावयास मिळत. श्री. ऊसकर (काल्पनिक नांव) नांवाचे धनिक गृहस्थ शिकवण्या व शिक्षकवृत्ती या उद्योगांवर गुजरातेत बराच पैसा मिळवून ते निवृत्त होऊन बडोद्यास येऊन रहात होते. त्यांच्या पुढे झोळी घेऊन जावयाचे असे आम्ही ठरविले आणि त्यांच्या घरात शिरलो. घरांत प्रथम प़डवी लागली. तिच्यांत आठ दिवसांचा केर साठला होता. त्या पडवींतून एका खोलीत शिरलो. तेथे एक बाक आणि पाण्याचे पिंप यांशिवाय दुसरे कांही नव्हते.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .