निवळ दुकानांत माल मांडून ठेवणे म्हणजे जसा व्यापार नव्हे तसेच कारखान्यांतून तो नुसता तयार करणे म्हणजेही व्यापार नव्हे. ही साधी परंतु फार महत्त्वाची गोष्ट लक्षांत न राहिल्याने आजवर कैकजणांचे व्यापार धुळीस मिळाले आहेत. आपणांस एकट्याला माल आणून दुकान थाटतां येईल अथवा यंत्रातून तो तयार करितां येईल, परंतु एवढ्याने व्यापार होत नाही. तसे होण्यास आणखी इतरांची गरज लागते. तो माल घेणारे ग्राहक मिळाले पाहिजेत. म्हणून दुकानांत काय अगर कारखान्यांत काय तेथे विक्रीची बाब आल्याशिवाय त्यांच्या खटाटोपाला व्यापार असे म्हणतां येणार नाही.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .