ती लखोटा केशवरावांच्या हातांतून घेण्याचा प्रयत्न करणार, तोंच हे सगळे ओळखून केशवरावांनी तो लखोटा आपल्या सदऱ्याच्या खिशांत घातला. कमलाबाईंच्या तोंडतोफेचा भडिमार आतां जोरांत चालू झाला असता, पण तितक्यांत त्यांच्या ओळखीची पिकेटर-स्वयंसेविका तेथे आली. “या यमुनाबाई, पिकेटिंग काय म्हणतं!” इत्यादी शब्दांनी स्वागत झाल्यावर यमुनाबाईंनी “व्हाइटवे-लेडलॉ कंपनीजवळ तुमच्यानंतर पिकेटिंगची पाळी घेतली तेव्हां कांहीं गर्दी नव्हती,” पण काही वेळाने असा असा प्रकार होऊन अशी अशी गर्दी झाली, व अखेर पोलिसांची लाठीबाजी वगैरे गोष्टींचें रसभरित वर्णन केले. हें वर्णन ऐकून पोलिसांना शिव्या वगैरे देऊन झाल्यावर वास्तविक यमुनाबाईंनी जावयाचें, पण आज त्या जाण्याचे लक्षण दिसेना. कांहीं तरी बोलायचे राहिले आहे असे त्यांच्या एकंदर चर्येवरून दिसे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .