मुंबईतील अशा या सकाळच्या अत्यंत धामधुमीच्या व उद्योगाच्या वेळीही बोरीबंदराच्या पलीकडे त्या मानाने चांगलीच शांतता होती. लोकांची आणि गाड्यांची तुरळक तुरळक रहदारी सुरू होती. नाक्यावरच्या वर्तमानपत्र विकणाऱ्यांच्या कर्कश आवाजाखेरीज, अद्याप येथे फार गलगा झाला नव्हता. एखादी लोकल गाड़ी आली तर तीतून लोक बाहेर जाऊं लागले, म्हणजे वर्तमानपत्रे विकणारे जणूं त्यांच्यावर तुटूनच पडत होते. मुंबईस नवीनच आलेल्या गृहस्थाला वर्तमानपत्रविक्यांचा हा गराडा थोडा भांबावूनच सोडतो. आतांच आलेल्या कल्याण लोकलमधून पांच तास उतारूंच्या जमावाला चारपांच वर्तमानपत्रविक्रेते मुलांनी घेरले; पण ते सगळे 'नही मंगता; नही मंगता’ ‘कितना गडबड करता है' करीत जणू त्यांना दूर लोटून निघून गेले.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .