त्याचे सर्वात मोठे दुःख म्हणजे चारचौघांसारखे त्याला जगतांच येत नाही. माणूस एकदां केव्हां तरी लिहून बसतो आणि ते भूत कायमचे त्याच्या मानेवर बसते. कांही तरी लिहिले पाहिजे, लिहीर राहिले पाहिजे ही व्यथा त्याला सारखी पोखरीत असते. मला पुष्कळदां वाटते, मी लिहिलेच नाही तर असे काय मोठे बिघडणार आहे? (पुष्कळ जणांना मजविषयी हेंच वाटत असेल!) या अफाट कालप्रवाहांत आपल्या अणुप्राय साहित्याचा कोठे टिकाव लागणार? आणि विश्र्वाच्या या प्रचंड पसाऱ्यांत त्याला कितीसे महत्त्व असणार? पण हे सारे मनोमन पटत असूनही लिहिले पाहिजे ही तळमळ मात्र नाहीशी होत नाही. आणि हवे तेवढे लिहितां येत नाही, हवे तसे लिहितां येत नाही हे दुःख मनाला पोखरीतच राहते.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .