आणि हा पतिपत्नींचा एकांताचा देखावा पहा. वज्रपाणीच्या अंगाखांद्यावर शृंगारसाज आहे. पण चेहरा उदासिन आहे. आणि स्त्री यशोधरा दुःखित मनाने त्याचे मन बहलविण्याकरतां झटत आहे. दासदासी धांवपळ करत आहेत आणि नर्तकीचा समोर नाच चालला आहे. तिची गति पहा. केस व कपड्यांवर विशिष्ठ कुंचल्यांचे फटकारे मारून गति स्पष्ट केली आहे. आणि ही फळफळावळ, पक्वान्नांची ताटें समोर येतच आहेत. त्या पलिकडच्या दाईच्या थाळींतून तो चोरटा नोकर पहा, फळ उचलतो आहे व तिरकी नजर करून तो त्याच्याकडे पहात आहे. आणि ही दुसरी दाई, मंचकापाठी लपून हळूच पतिपत्नीचे भाषण ऐकत आहे. आमच्या पुर्वाचिन कलाकारांच्या पदरीं विनोदबुद्धीही होती, आणि तीही भरपूर प्रमाणांत त्याचप्रमाणें व्यवहारी अंगाचीही त्यांस पूर्ण माहिति होतीं, हे कुणी नाकारील कां ?
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .