दार उघडलें गेलें. विलासची तरुणपणानं अधिकच चतुर बनलेली नजर तिच्या चर्येकडे गुंतली. अठरा एकोणीशीचं मोहक वय तरुणीच्या रूपांत केवढी क्रांति करीत असतं! सारे रम्य भाव चर्येवर क्षणांत प्रकट करण्यांचं सामर्थ्य मुलींना निसर्ग यावेळी देतो. जगातला सारा गोडवा यावेळी मुलीच्या नजरेंत उतरतो जसा! विलासनं क्षणांत हेरलं, की पोरीचा आवाज छान आहे पण रूप साधारण पैकी आहे. आजकालची वेषभूषा मुलींना अधिकच ठाकठीक व मनोहर दिसत नाहीं कां? तिचा बांधासुद्धां आकर्षक होता. क्षणभर तिनें धीट नजर लावून या तरुणाकडे पाहून घेतलें. कुणालाही आवडेल असाच होता विलास, प्रकृति चांगली, रूपही चांगलं नि कपडेही उंची!
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .