मराठींत व हिंदीत कांही शब्द तेच असले तरी त्यांचा अर्थ इतका वेगळा आहे की, त्यांचा गफलतीने उपयोग केला तर बोलणारे व ऐकणारे यांच्यामध्ये गैरसमज उत्पन्न होतील किंवा आपले लेखन-भाषण हास्यास्पद होईल. एखाद्या हिंदी भाषिकाने भोजनास आलेल्या ‘आगन्तुका’चे आभार मानले किंवा एखादे वेळी असे म्हटलें—‘संसारांत’ प्रत्येक ‘जंतू’ने जन ‘जागरण’ करून एकमेकांची ‘रक्षा’ करण्याची ‘शिक्षा’ देण्याची ‘चेष्टा’ करावी असा माझा आपणास ‘विनय’ आहे.—तर आपल्याला हा गृहस्थ थट्टा तर करीत नाही ना अशी शंका येईल. परंतु शुद्ध हिंदी भाषेंत या शब्दांचा अर्थ चांगला असून त्यांचा उपयोग यथायोग्य आहे असे समजल्यावर हिंदी भाषेच्या आपल्या अभ्यासांत शब्दांची भर पडली असेंच आपल्याला वाटेल.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
saurabh photography
2 वर्षांपूर्वीहिंदी ही राष्ट्रभाषा नसून देशातील 26 भाषा या राष्ट्रभाषा आहेत. * संदर्भ : 1. https://www.deccanherald.com/india/hindi-is-not-national-language-gujarat-hc-held-in-2010-761420.html
JAYANT PRABHUNE
3 वर्षांपूर्वीहिंदीची उगाच भीती वाटून घेऊ नये. सरावाने फर्डी बोलता येईल. पण हिंदीच्या राजस्थान हरियाणा उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश दिल्ली या सर्व ठिकाणी वेगवेगळ्या लकबी आहेत. आणि सरावाने त्या कळतील.
Ashwini Sathe-Ghangrekar
3 वर्षांपूर्वीसुंदर लेख आहे. आपण हिंदी बोलतो पण आपल्याकडून बऱ्याच चुका होतात. बोलल्यावर लगेच लक्षात येतात पण सुधारत नही. आता मी प्रयत्नपूर्वक हिंदी सुधारण्याकडे लक्ष देईन. धन्यवाद.