एकदां मला स्वप्न पडले की मी सभेचा अध्यक्ष या नात्याने इंग्रजीत भाषण करीत आहे. जागे झाल्यावर आठवणीने मी माझ्या भाषणाच्या पंधरावीस ओळी लिहून काढल्या आणि खरोखर त्या सुसंबद्ध व व्याकरणदृष्ट्या अत्यंत शुद्ध होत्या. मी इंग्रजी सहावीत असतांना संस्कृतमध्ये कविता करण्याचा प्रयत्न केला. अर्थातच तो मला साधला नाही, पण एके दिवशी स्वप्नांत मी एक श्र्लोक रचला त्याचा अर्थ मला अद्यापि आठवतो तो ‘विरहानल दग्धानां भवत्याशा निबंधनम्’ असा होता. लहानपणी ‘मनोरंजनां’तील गोष्टी वाचण्याचा मला फार नाद असे व एखादी गोष्ट लिहावी असे मला नेहमी वाटे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .