या वर्षी लॉर्ड लॅन्सडौन स्वदेशी जाऊन त्या जागी लॉर्ड एल्गिन हे व्हॉईसरॉय आले. लॅन्सडौन हे निरुपद्रवी तितकेच निरुत्साही व कर्तव्यशून्य असल्यामुळे त्यांच्या कारकिर्दीत नाव घेण्याजोगी बरीवाईट कोणतीच गोष्ट झाली नाही. १८९५ सालांत काँग्रेसचे अधिवेशन पुण्यांत झाले. अध्यक्षस्थानी सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. याच वेळी राष्ट्रीय सभेच्या मंडपांत सामाजिक परिषद भरवू नये हा सुप्रसिद्ध वृथावाद पुण्यात बराच गाजला गेला. अध्यक्षांनी आपल्या भाषणांत काँग्रेसला बंगाल्यांतील हिंदू देवतांत स्थान मिळू लागले, असे सांगितले. कौन्सिलच्या सुधारणा, लष्करी खर्च, साम्राज्य प्रसाराची हांव इत्यादी प्रश्नांची चर्चा त्यांच्या भाषणात होती.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .