विषयनियामक कमिटीच्या बैठकीत व काँग्रेसच्या जाहीर बैठकीत म. गांधींच्या असहकारितेच्या ठरावावर खडाजंगी वाद झाला. नामांकित पुढाऱ्यांत पं. मोतीलाल नेहरू मात्र गांधींच्या बाजूचे होते. बाकी बाबु चित्तरंजन दास, बिपिनचंद्र पाल, पं. मदनमोहन मालवीय, बॅ. जिना, बॅप्टिस्टा, केळकर, खापर्डे, मिसेस बेझंट, जयकर, कस्तुरिरंग अय्यंगार, सत्यमूर्ति, मुंजे, आणे या सर्व जणांनी गांधींच्या ठरावाला कसून हरकत घेतली. अध्यक्ष लाला लजपतराय यांनीही हा ठराव सध्या राष्ट्रीय सभेवर लादण्यात येऊ नये असे सुचविले. “हिंदुस्थानला पूर्ण अंतर्गत स्वराज्य ताबडतोब द्यावे,” अशी मुख्य मागणी करून ऑल इंडिया काँग्रेसकमिटीने प्रधान मंडळाकडे एक डेप्युटेशन पाठवावे व ती मागणी मान्य न झाल्यास व सहकारीतेचे तत्त्व स्वीकारावे, अशी उपसूचना पालबाबूंनी जाहीर बैठकीत मांडली.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .