याच बैठकीत गांधीजींनी अश्रू गाळले व आता आपण राजकारणातून निवृत्त होणार असे उद्गार काढले. हिंदू-मुसलमानांचे दंगे सर्व देशभर चालू होते. सप्टेंबरात गांधीजींनी २१ दिवसांचा उपवास केला व त्या अखेर दिल्ली येथे हिंदू-मुसलमान ऐक्य परिषद भरली. सरकारच्या दडपशाहीला फळ न पडता ऑक्टोबरात बंगाल्यांत ऑर्टिनन्स पुकारले जाऊन धरपकड सुरू झाली. नोव्हेंबरात मजूरमंत्रिमंडळाचा पराभव होऊन इंग्लंडांत बाल्टविनचे कॉन्झर्व्हेटिव्ह मंत्री मंडळ अधिकार उडवून लॉर्ड बर्कनहेट हे सुलतान अधिकारी भारतमंत्र्याच्या जागी आले. या सर्वांचा परिणाम होऊन कलकत्त्यास ६ नोव्हेंबर रोजी गांधी, दास ऊस व नेहरू यांच्या दरम्यान सम्राटाचा एक करार झाला. या करारात असे ठरले की, राष्ट्रीय सभेने परदेशी कापडाखेरीज बाकीचे बहिष्कार राष्ट्रीय कार्य या दृष्टीने रद्द करावे, व खादीची निपज, हिंदु-मुसलमानांत व जातीजातींत ऐक्यसंवर्धन, अस्पृश्यता निवारणादी विधायक कार्यक्रम सर्व पक्षांनी चालवावा, कौन्सिलांत शिरणारा स्वराज्यपक्ष हा काँग्रेसचा असून त्यांनी आपले कार्य कॉंग्रेसतर्फे चालवावे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .