काव्यकलाबाईंच्या बोलण्याला आतां निराळी धार आली होती. एका उपेक्षित वाङ्मयसेविकेची बाजू मांडणाऱ्या विदुषीचा तजेला त्यांच्या मुखावर आतां दिसूं लागला होता. किंचित् पुरोगामी असलेले दोन दांत किंचित् अधोगामी असलेल्या ओठावर त्यांनीं भावनावेगानें दाबून घेतले आणि अस्सल शहरी वातावरणांत सासुरवास भोगणाऱ्या एका आर्य कन्येचा माहेरचा ओढा त्यांनी वाचलेल्या पुढील काव्यातून वाहू लागला.
"ह्या गीतांतील भूमिका अशी! व्हरांड्यात एका कोपऱ्यांत ठेवलेल्या कचऱ्याच्या पिंपावर बसलेल्या चिमणीला उद्देशून ही सासुरवाशीण म्हणते आहे :
माझिया माहेरा जा रे पांखरा, माझिया... माहेरा जा!
ट्राम आहे सोबतीला–तिची गोड ठणठण वाट दाखवाया!
मिळेल ग पोस्टमन"
"सुंदर!!” मी उद्गारलों. आपल्या डोळ्या तील अश्रु आवरीत काव्यकलाबाई वाचू लागल्या
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .