उदाहरणार्थ, 'अजब न्याय वर्तुळाचा' हे बेश्तचं नाटक खरं तर लहान मुलांसाठी असलेलीच कथा आहे. आम्ही जी बालरंगभूमीवर नाटकं केली त्यातील आशय प्रौढ रंगभूमीवरीलच होता. 'इंद्राचं आसन, नारदाची शेंडी' आम्ही करत असू. पॅरॅडी हा प्रौढांच्या रंगभूमीवरचाच फॉर्म आहे. फक्त थिएटरची व्याख्या जरा जास्त लवचिक करावी लागते एवढंच. आपल्याइथं थिएटरपेक्षा 'इंडस्ट्री'च आहे. 'इंद्राचं आसन' काय किंवा 'प्रेमकहाणी' काय दोन्ही 'थिएटर' होती. मला नेहमी असं वाटतं की आपल्याकडे थिएटर नाहीय. केवळ तो व्यवसाय आहे. आपल्याकडील व्यावसायिक नाटकं पाहा. त्यांचा सेट हा नाटकाच्या आशयाशी एकरूप होण्याऐवजी स्वतंत्रपणे प्रेक्षकांच्या सवयीचा, शोभेचा असतो. पण विचार करा, आपण 'हॅम्लेट' किंवा 'वेटिंग फॉर गोदो' अशा शोभेच्या सेटवर करू शकू का?
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .