व्यंगचित्रकार व साधा चित्रकार यांत बऱ्याच दृष्टीने फरक आहे. विशिष्ट विषय निवडून तो विशिष्ट प्रकाराने विनोदी स्वरूपात रेखाटण्याचे काम व्यंगचित्रकार करतो. व्यंगचित्रकार चित्रकलेचे नियम दुय्यम दर्जाचे मानतो. ते त्याला चांगले अवगत मात्र असावे लागतात. सर्कशीतला विदूषक जसा चांगला कसरतपटू असावा लागतो, त्याप्रमाणे उत्कृष्ट प्रतीची कल्पकता व कुंचला प्रभावीपणे वापरण्याचे कौशल्य या दोन गोष्टींचा संयोग असल्यावर उत्तम दर्जाचा व्यंगचित्रकार होऊ शकेल. चांगला चित्रकार हा उत्तम व्यंगचित्रकार होऊ शकेलच असे नाही; परंतु दर्जाचा व्यंगचित्रकार मात्र उत्तम चित्रकार असू शकेल!
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .