'हंस' च्या १९६८ च्या दिवाळी अंकात काढलेल्या एका हास्यचित्रात साहित्यपरिषदेत 'मराठी भाषेच्या शिवाजी'च्या तैलचित्राचं अनावरण एका साहित्याचा गंध नसलेल्या तथाकथित पुढाऱ्याकडून झालेलं दाखविलं होतं. उद्घाटन झाल्यावर शेजारच्या इसमाच्या कानात तो हळूच विचारतो की, 'हे शिवाजी कुठले हो?' त्याच सुमारास दुर्दैवाने पुण्याच्या मंडईतील श्री. विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा पुतळा कोणीतरी नतद्रष्टाने फोडला होता, या घटनेचा उल्लेख करून मुंबईच्या एका 'मयूरभक्ताने' 'मराठ्या'तून मी विष्णुशास्त्री चिपळूणकरांसारख्या थोर व्यक्तीचा घोर अपमान केला म्हणून 'पांचजन्य' केला व माझा आणि 'हंस' चे तरुण संपादक श्री. आनंद अंतरकर यांचा 'धिक्कार' केला होता. वास्तविक विनोद स्पष्ट होता. चित्रात उद्घाटक पाहुण्यांचा अडाणीपणा दर्शविला होता.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .