मंत्रीपद अगर राजकारणातील अधिकारपद जातांच पुष्कळ मोठेमोठे भासणारे पुढारी निष्प्रभ झालेले दिसून येतात. बऱ्याच टीकाकारांना शंकररावजींचें असेंच हंसें होईल, असें वाटत होतें; परंतु प्रत्यक्षांत मात्र त्यांचें महाराष्ट्रापुरते मर्यादित पुढारीपण जाऊन त्यांना अखिल भारतीय महत्त्व प्राप्त झालेले दिसून येतें. त्यांनी नंतर सर्वसेवा संघ व सर्वोदय यांच्या कार्यास संपूर्णतः वाहून घेतलें आणि त्यांना त्यांच्या खऱ्या कर्तृत्वाला वाव देण्याची संधी मिळाली आणि तिथे ते आपल्या स्वयंतेजानें तळपत आहेत. आज सर्वोदयाच्या भूदानयज्ञांत ऋषिवर्य विनोबाजींच्या खालोखाल मानाचें व प्रेमाचें स्थान जनतेनें ऋषितुल्य शंकररावजींना दिलेले आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
ANKUSH RATHOD
4 महिन्यांपूर्वीशंकरराव देव महाराष्ट्राचे सरचिटणीस यांचे राजकीय कारकीर्द संदर्भात माहिती हवी आहे. शंकरराव देव यांच्या वर मी पीएच.डी चे संशोधन करत आहे