कालिदासाच्या अगोदर भासाने 'अविमारक' किंवा 'स्वप्नवासवदत्त' सारखी नाटके लिहून सुखात्मिका (Comedy) या नाट्यप्रकाराचा एक चांगला आदर्श निर्माण केला होता असें, भासाचीं नाटकें उपलब्ध झाल्यापासून वाटतें. कालिदासाच्या लेखनावर भासाचा प्रभाव पडलेला आहे यांत शंका नाही. पण अंशतः प्रभावित होऊनहि कालिदासाने 'मालविकाग्निमित्र' नाटकाच्या रूपाने खेळकर रंगांनी रंगलेल्या सुखात्मिकेचा एक वेगळा पायंडा पाडलेला दिसतो. राजकुटुंबाच्या अंतःपुरांतील कलागती एवढाच नाट्यविषय निवडून त्याचें हास्यकारक चित्रण करण्याचा हा प्रयत्न निःसंशय विलोभनीय होता. कालिदासाच्या या नाट्यप्रकाराला लोकप्रियता लाभून त्याचा संस्कृत साहित्यावर परिणामहि झाला असावा.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .