तथापि, मी माझ्या स्वतंत्र मगदुराप्रमाणे मूळ ऐतिहासिक सत्यान्तर्गत घटना मात्र थोड्याशा फेरफारानें बऱ्याचशा राबविल्या आहेत ही गोष्ट मला नाकबूल करतां येत नाहीं. उदाहरणार्थ: नाटकांतील गांगड्या तेल्याची भूमिकाच घ्या! सबंध नाटकांत हें माझें एकटे एकच काल्पनिक पात्र म्हणून मीं रंगविलें आहे. कारण, वासोट्याच्या बंडाळीचा शेवट, हा घरफुंकी धोरणाच्या धर्तीवरच मूळ ऐतिहासिक घटनेत झाला असल्याने, मला असे एखादें 'आगलावे पात्र' निर्माण करावेच लागलें! मात्र, गांगड्याला मी देशद्रोही फितूरी न बनवितां, त्याला उघड उघड स्वराज्य स्वरक्षणाचा वेठबिगारी बनविला आहे! आणि शिवाय त्याला, ताईच्या नवऱ्याचा मानहि मीं बहाल केला आहे! कारण, ताई विवाहिता पण परित्यका, तेल्याची बायको असल्याचा मूळ उल्लेख आहे!
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .