अंक - रहस्यरंजन, दिवाळी १९६१
बाहेर समोरच्या आंगणांत चारपांच मुली रंगीत चेंडू एकमेकीकडे फेंकून खेळत होत्या, व तेथून थोडे दूर राहून शैलू खेळ पहात होती. तो रंगाचा चेंडू कुणीहि पकडला तरी ती टाळ्या वाजवून उभ्या उभ्याच उड्या मारत होती. तिच्या झग्याची बटणें तुटली होती. आणि तो खांद्यावर ठेवायला तिला तो वरचेवर ओढावा लागे. एकदां चेंडू तिच्याकडे आला. तिनें तो उचलून परत फेंकण्यासाठी हात उंचावला, तो एक मुलगी आली, तिने हिसकावून घेतला, व शैलूला उगाचच मागे ढकलले, शैलूनें झगा खांद्यावर ओढला, व पहिल्या खेपेला टाळी न वाजवतां गप्प उमी राहिली. पण नंतर ती सारे विसरली, व पुन्हां टाळ्या वाजवत उड्या मारू लागली.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .