त्या काळीं 'किर्लोस्कर', 'शाहूनगरवासी' आदि नांवारूपाला आलेल्या नाट्य-संस्थांप्रमाणे सर्वच नाटक-मंडळ्यांची स्थिति कांहीं स्पृहणीय नव्हती. याचा अनुभव गणूला थोड्याच दिवसांत आला. ‘मुंबईकर नाटक मंडळी’ समवेत तो चिंचणी-तारापूरला गेला होता. तेथें झांपाच्या कच्च्या थिएटरमध्ये रात्री बांकावर झोंपावें लागे. संस्थेची सांपत्तिक स्थिति अतिशय हलाखीची असल्यामुळे दोन्ही वेळां पोटभर जेवण मिळणें मुष्किलीचें झालें होतें. कंपनीचें कांहींतरी सामान विकून येणाऱ्या पैशांतून खिचडी उकडली जायची, आणि मग सर्वांच्या तोंडीं चार घांस पडायचे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .