अंक - रसरंग दीपावली विशेषांक, नोव्हेंबर १९५८
माझ्या पहिल्या मैफलीचा इतिहास म्हणजे स्मृतींचें अेक रेशमी वस्त्र आहे जणुं बखले घराण्याची पुण्याई, गुरुकृपेची रोषणाई, रसिकांची भलाई इत्यादि अनेक तलम धाग्यांनीं तें विणलें गेलें आहे. बालगंधर्वांचा आशीर्वाद म्हणून माझी पहिली मैफल मी आजन्म विसरणार नाहीं.
मानवी जीवनांत अनपेक्षित योगायोगांना महत्त्वपूर्ण स्थान असतें, असें कित्येक वेळां माझ्या मानवी जीवनाकडे पाहिल्यावर मला वाटतें. महाराष्ट्रानें लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व नटसम्राट बालगंधर्व ह्यांच्यावर अतोनात प्रेम केलें आहे, हें कोणीहि मान्य करील. ह्या महान् व्यक्तींमधील एक, नटसम्राट बालगंधर्व, ह्यांच्या गायनाच्या मैफलीऐवजी, माझी पहिली मैफल तेथें घडून यावी, हा माझ्या जीवनांतील एक अविस्मरणीय शुभ प्रसंग होय.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .