महिला क्रिकेट

पुनश्च    शिरीष कणेकर    2018-02-21 06:00:58   

अंक-: माहेर ; वर्ष-:जानेवारी १९६८ काही देशांत बायका क्रिकेट खेळत असतात असं जर मी तुम्हाला सांगितलं तर मी ‘फेकंफेक’ करतोय असं तुम्ही म्हणाल. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंडमधील ललना अगदी बाप्यालोकांप्रमाणे पॅड-ग्लोव्हज्‌ घालून क्रिकेट खेळत असतात. छोटेमोठे सामने तर इथे नेहमीच चालतात. पण या देशात आपसात कसोटी सामने देखील होत असतात. आईच्यानं खोटं नाही सांगत! सायरावहिनींची शप्पथ! (‘दिलीप’ आम्हांला भावासारखा!) पण कसं शक्य आहे हो? पंधरा बायका (अकरा फिल्डर्स, दोन ‘बॅट्‌सवीमेन’, दोन अंपायर्स) जमल्यावर क्रिकेट खेळण्यात वेळ घालविण्याचा सरासर मूर्खपणा करतील का? मला वाटतं की बॅटबीट फेकून देऊन त्या मैदानावर कोंडाळं करून बसतील व हजर नसलेल्या (म्हणजे पॅव्हिलियनमध्ये बसलेल्या) खेळाडू भगिनींविषयी उद्बोधक कुचाळक्या करतील. तीनच्या चित्रपटाला जायचे असेल तर ज्यांचे प्रसाधन सुरू झाल्यानंतर सहाचा शो मिळाला तरी भाग्य समजावं लागतं,त्या स्त्रीजातीच्या या बावीस प्रतिनिधी मॅचच्या दिवशी कधी वेळेवर मैदानावर येतील काय? आणि समजा झाली एकदाची मॅच सुरू. स्कर्टवर चेंडू पॉलीश करीत ओपनिंग बोलरने स्टार्ट घेतला तर तेवढ्या अवधीत ‘सकाळी मेली घाईच झाली’ असे म्हणत सलामीला गेलेल्या रमणीने कुठून तरी छोटा आरसा, पावडर व लिपस्टिक काढून गोलंदाजी ‘फेस’ करण्याऐवजी आपल्या ‘फेस’ला ‘फिनिशिंग टचेस्‌’ द्यायला सुरुवात केली तर त्यामुळे इरेस बळी पडून तिला ‘नटवी मेली’ म्हणत मैदानावरील उरलेल्या अबला जर चेहऱ्याची ‘डागडुजी’ करू लागल्या तर खेळ पुढे चालायचा कसा? 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


विनोद , माहेर , क्रीडा

प्रतिक्रिया

  1. jayant t.dastane

      5 वर्षांपूर्वी

    शेवटी काहीही म्हणा पण कणेकर ते कणेकरच! 52 वर्षां नन्तर सुध्दा वाचनाची तीच मज्जा मिळतेय! कणेकर मस्तच!

  2. श्रीपाद जोशी

      5 वर्षांपूर्वी

    वा!

  3. prashant1414joshi@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    नेहमप्रमाणेच कणेकरी सिक्सर ... एव्हरग्रिन लेखन

  4.   5 वर्षांपूर्वी

    फार छान लेख.

  5.   5 वर्षांपूर्वी

    फारच छान

  6. mukundmk

      5 वर्षांपूर्वी

    शिरीष कणेकर यांचे क्रिकेटवरील लेखनही अप्रतिमच असायचे. फटकेबाजी हा कार्यक्रम व क्रिकेट वेध हे पुस्तक खरोखर सुंदर व वाचनीय ! यांचे क्रिकेट विषयक अन्य लेखही असतील तर पाठवावेत. जुन्या काळातील क्रिकेट समीक्षक नेव्हिलकार्डस वरचे लेख मिळाल्यास दुधात साखरच ! -मुकुंद करकरे !

  7. Kiran Joshi

      7 वर्षांपूर्वी

    व्वा! मस्त!?



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts