अंकः केरळकोकिळ, जानेवारी १९०१
प्रेम ही एक ह्या जगामध्ये अजब चीज आहे. प्रेमासारखा मिष्ट व इष्ट असा पदार्थ नाही. अंतःकरणास लोलुप करून मोहपाशांत जखडून टाकणारी, प्रेमाइतकी चित्ताकर्षक शक्ति दुसऱ्या कोणामध्ये आहे? अमृताचे माधुर्य, लौकिक, व गुम कानांनी ऐकून आपण केवळ जिभळ्याच चाटित बसतो. म्हणून ते मृगजलवत् होय. परंतु ज्याची अपूर्व गोडी चाखावयास मिळते; ज्याच्या लोकोत्तर गुणाचा उपभोग घ्यावयास सांपडतो; ज्याच्या योगाने आपल्या आयुष्यास चिरस्थायित्व येते; ज्याच्या योगाने आनंदास अमरत्व प्राप्त होते; असे जे प्रेम, तेच ह्या भूलोकचे प्रत्यक्ष चालते बोलते अमृत होय. प्रेमाची बरोबरी दुसरे कोण करणार? प्रेम हे केवळ ईश्र्वराचे स्वरूप. प्रत्यक्ष परमेश्र्वराची मूर्ति तेच प्रेम. म्हणूनच त्याला सारे जग मोहून पडते. प्रेम ही सर्व गुणांची, अखिल सौंदर्याची, सर्वोत्तम औदार्याची, आणि लोकोत्तर शौर्याची ओतलेली मूस आहे. प्रेमामध्ये जर भगवत्तत्त्व नसते, तर त्याला दीडदमडीच्या उधारीने सुद्धां कोणी विचारले नसते!
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .