"लायकी नाहीं हें कबूल. पण बायजीनं किंवा रावजींनीं तस भेदभाव कधीं दाखवला नाहीं आपल्याशीं. आपण असे वासूनाक्यावर उभे असलों अन् रावजी पास होत असला तर तो हंसून, ओळख दाखवून जाईल. गादीवर भेटला तर तो हटकून सिग्रेट 'ऑफर' करील. सगळ्यांत 'टॉप' म्हणजे बारश्याला. पोक्या तू आला नव्हतास. काय झालं माहित आहे ? आम्हीं त्यांना सकाळपासून सगळी 'हेल्प' केली. म्हणजे, रावजीच्या ऑफिसमधले बडे बडे महेमान येणार होते ना, तर आम्ही म्हणालों, चिकरमाने फॅमिली आपल्याला एव्हढा रिस्पेक् देतेय्, तर अश्यावेळेला उपयोगी पडावं. संध्याकाळी चिकरमान्यांकडेच आम्ही जेवायला होतों... मग काय झालं ? महेमान गेले. आम्ही सगळे 'स्टाईल'मधे कोचावर बसून रावजीबरोबर पत्ते कुटले, भ्यांचोद !...
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .