त्या दोन्ही श्वानयुवती मरीन ड्राइव्हच्या रहिवाशी होत्या. केरपोतेरें; स्वयंपाकपाणी, ह्या भानगडी त्यांना कुठून ठाऊक असणार? आपल्या सौंदर्यांची जोपासना करण्यांत, स्त्रियांची सचित्र मासिकेँ चाळण्यांत, आकाशवाणीचे सिलोन-संगीत ऐकण्यांत, क्लबांतून भटकण्यांत व स्वयंप्रेरिकेतून फिरण्यांत त्यांच बहुतेक वेळ निघून जात असेल! म्हणून तर त्या इतक्या धुवट, नीटस व गोंडस दिसत होत्या!
मी त्या उच्चभ्रू श्वानींकडे कांहीं वेळ पहात राहिलों, त्याहि डोळ्यांच्या कोंपऱ्यांतून माझ्याकडे पहात होत्या. मधूनच आपल्या कंठांतून भाव- मधुर ध्वनी काढीत होत्या; माना वेळावीत होत्या व जिभली फिरवीत होत्या. पण अखेर मी त्यांना ओळखले. प्रसाधन-साहित्यानें माणूस (वा कुत्री) आपले वय लपवून लपवून कितीसे लपविणार!
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .